pink e rikshaw yojana marashtra apply online
अमरावती: महिला व बालविकास विभागातर्फे शहरी आणि ग्रामीण भागातील गरजू महिलांना स्वावलंबी बनवण्यासाठी पिंक ई-रिक्षा देण्यात येणार आहे. या योजनेत महिलांना रिक्षा खरेदीसाठी आर्थिक साहाय्य देण्यात येणार असून, राज्य शासनाकडून २०% अनुदान आणि ७०% कर्ज मिळणार आहे. एकूण ६०० महिलांना या योजनेचा लाभ मिळणार आहे.
योजनेचा उद्देश
पिंक ई-रिक्षा योजनेद्वारे महिलांना आर्थिक सक्षमता प्रदान करणे, त्यांचा सामाजिक आणि आर्थिक पुनर्वसन घडवणे आणि स्त्री सशक्तीकरणाला चालना देणे हा मुख्य उद्देश आहे. या योजनेमुळे महिलांना सुरक्षित रोजगाराच्या संधी उपलब्ध होतील आणि त्यांना स्वावलंबी होण्यासाठी प्रोत्साहन मिळेल.
कर्ज आणि अनुदानाची रचना
- ई-रिक्षा किमतीच्या २०% अनुदान: राज्य शासन उचलणार.
- ७०% कर्ज: नागरी सहकारी बँका, जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँका, राष्ट्रीयीकृत बँका आणि खाजगी बँकांद्वारे उपलब्ध.
- १०% स्वहिस्सा: लाभार्थी महिलांनी भरणे आवश्यक.
- परतफेडीची मुदत: ५ वर्षे.
पात्रता अटी
- अर्जदाराचे वय २० ते ४० वर्षे असावे.
- कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न ३ लाख रुपयांपेक्षा जास्त नसावे.
- अर्जदार महाराष्ट्राचा रहिवासी असणे बंधनकारक.
- विधवा, घटस्फोटित, अनाथ प्रमाणपत्रधारक किंवा बालगृहातील माजी प्रवेशित महिलांना प्राधान्य.
- दारिद्र्यरेषेखालील महिलांनाही योजनेत प्राधान्य मिळेल.
ration card news maharashtra 2025 मोफत राशन योजनांमध्ये बदल! नवीन लाभ मिळवण्यासाठी काय कराल?
अर्जासाठी आवश्यक कागदपत्रे
- आधार कार्ड
- पॅन कार्ड
- अधिवास प्रमाणपत्र
- उत्पन्नाचा दाखला
- रेशन कार्ड (केशरी/पिवळे)
- बँक पासबुक
- पासपोर्ट फोटो
- महिला स्वतः रिक्षा चालवण्याचे हमीपत्र
- बँक कर्ज नसल्याचे हमीपत्र
प्रशिक्षण सुविधा
ई-रिक्षा पुरवणाऱ्या कंपनीकडून अर्जदार महिलांना परमिट, परवाना, आणि प्रशिक्षण उपलब्ध करून दिले जाणार आहे.
अर्ज प्रक्रिया
महिला आणि बालविकास भवन, कॅम्प रोड, अमरावती, तसेच स्थानिक महापालिका आणि जिल्हा परिषदेच्या कार्यालयांमध्ये अर्ज सादर करता येतील. इच्छुक महिलांनी आपली संपूर्ण कागदपत्रे सादर करून अर्ज करावा.
👉👉 join free whatsapp group
महत्त्वाचे
- योजनेचा लाभ एकदाच मिळेल.
- अर्ज प्रक्रिया जलद पूर्ण करण्यासाठी कागदपत्रांची पूर्तता आवश्यक आहे.
- महिला व बालविकास विभागाच्या अधिकृत कार्यालयांमध्येच अर्ज स्वीकारले जातील.
अधिकृतांचे आवाहन
जिल्हाधिकारी सौरभ कटियार आणि महिला व बालविकास विभागाचे अधिकारी उमेश टेकाळे यांनी महिलांना योजनेचा लाभ घेण्यासाठी पुढे येण्याचे आवाहन केले आहे.