लाडकी बहीण योजना 2024: संक्रांतीसाठी फडणवीस सरकारकडून मोठी भेट! ladki bahin yojana makar sankranti gift

 ladki bahin yojana makar sankranti gift

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

ladki bahin yojana makar sankranti gift

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतून लाडक्या बहिणींसाठी आनंदाची बातमी आहे! फडणवीस सरकारकडून मकर संक्रांतीनिमित्त लाडक्या बहिणींना मोठे गिफ्ट मिळणार आहे.

नोव्हेंबर महिन्याचा हप्ता दिवाळीभाऊबीजेसाठी आधीच दिला गेला होता. आता डिसेंबर आणि जानेवारी महिन्याचे दोन्ही हप्ते मिळणार असल्याची माहिती समोर आली आहे. संक्रांतीपूर्वी लाडक्या बहिणींच्या खात्यावर थेट ₹3,000 जमा होणार आहेत.

अर्जांची फेरतपासणी स्थगित

राज्यातील सुमारे पावणेतीन कोटी लाडक्या बहिणी या योजनेचा लाभ घेण्यासाठी पात्र ठरल्या आहेत. सर्व अर्जदारांना लाभ मिळणार असून, सध्या कोणतेही अर्ज बाद करण्याचे आदेश नाहीत. नवीन अर्ज तपासणीच्या शेवटच्या टप्प्यात आहेत, त्यामुळे पात्र महिलांना कोणताही अडथळा येणार नाही.

लाडकी बहिण योजना: लाडकी बहीण योजनेवर मुख्यमंत्री फडणवीसांचा धडाकेबाज निर्णय, वाचून तुम्हीही थक्क व्हाल!”

राज्य सरकारची मोठी तरतूद

मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेसाठी फडणवीस सरकारने हिवाळी अधिवेशनात ₹1,400 कोटींची तरतूद केली आहे. याशिवाय, मार्चमधील अर्थसंकल्पीय अधिवेशनात हप्ता वाढवण्याचा विचार सुरू आहे.

योजना महायुतीसाठी फायदेशीर

‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना’ ही राज्य सरकारची महत्त्वाकांक्षी योजना असून, महिलांकडून याला जोरदार प्रतिसाद मिळतो आहे. विधानसभा निवडणुकीत ही योजना महायुतीसाठी अत्यंत फायदेशीर ठरली आहे.

संक्रांतीसाठी गोड बातमी!

लाडक्या बहिणींना डिसेंबर आणि जानेवारीचे हप्ते एकत्र मिळणार असल्याने या संक्रांतीला त्यांच्या चेहऱ्यावर हसू फुलणार आहे. राज्यभरातील महिलांसाठी हा निर्णय अत्यंत दिलासादायक ठरणार आहे.

लाडकी बहीण योजनेची अधिक माहिती मिळवण्यासाठी अधिकृत वेबसाइटला भेट द्या आणि तुमच्या खात्यावर रक्कम कधी जमा होणार आहे, हे जाणून घ्या!

Leave a Comment