Favarni Pump Yojana maharashtra 2024: शेती फवारणी पंप योजना महाराष्ट्र 2024 – 100% अनुदान, अर्ज कसा करावा आणि अधिक माहिती

Favarni Pump Yojana maharashtra 2024
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Favarni Pump Yojana maharashtra 2024

नमस्कार शेतकरी मित्रांनो, शेतकरी मित्रांनो आपल्याला शेती करताना अनेक अवजारांची तसेच यंत्रणांची आवश्यकता भासते. त्या गरजा पूर्ण करण्यासाठी सरकार अनेक योजना राबवत असते. शेती करत असताना लागणारे अवजारांची गरज सर्व शेतकऱ्यांना असते आणि जर शेतकऱ्याकडे ते स्वतःचे उपकरण असेल तर खूपच चांगले होते. परंतु ज्या शेतकऱ्यांकडे स्वतःची यंत्रणा नसतात त्या शेतकऱ्यांना अनेक परिस्थितीचा सामना करावा लागतो. अशा शेतकऱ्यांना ती अवजारे किंवा यंत्रणे भाड्यावर घ्यावे लागतात, यामुळे शेतकऱ्यांना बरेच पैसे खर्च करावे लागतात. त्यामुळे शेतीमध्ये उपयुक्त पडणाऱ्या उपकरणांची (एग्रीकल्चर मशिनरीज) उपयुक्तता लक्षात घेऊन (maharashtra goverment) महाराष्ट्र सरकार शेतकऱ्यांना ट्रॅक्टर, कडबा कुट्टी यंत्र, ठिबक सिंचन, तुषार सिंचन, अशा अनेक कृषी यंत्रांवर सरकारने अनेक योजना राबवल्या आहेत. ह्या योजना शेतकऱ्यांना कृषी यंत्रांची खरेदी करण्यासाठी अनुदान देते. अशा अनेक प्रकारच्या योजनांचे अपडेट्स मिळवण्यासाठी आपला व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा

अशा अनेक योजनांपैकी ही एक योजना आहे ती म्हणजे शेतकरी फवारणी पंप योजना महाराष्ट्र 2024

Shetkari Favarni Pump Yojana maharashtra 2024 संपूर्ण माहिती

शेतकरी मित्रांनो शेतकरी फवारणी पंप योजना महाराष्ट्र 2024 या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना शेतकरी फवारणी पंपावर 100% अनुदान देण्यात येणार आहे. हा पंप इलेक्ट्रिसिटी वर चालणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना जास्त मेहनत करायची गरज भासणार नाही. याचा विचार करून महाराष्ट्र सरकारने शेतकऱ्यांसाठी शेतकरी फवारणी पंप योजना राबवली आहे.

मोफत बॅटरी फवारणी पंप ही योजना का सुरू करण्यात आली?

राज्यातील अनेक भागातील शेतकऱ्यांना पिकांना फवारणी करण्यासाठी खूप मेहनत घ्यावी लागते त्यामुळे त्यांना फवारणी पंपाचे कमतरता जाणवते. यामुळे शेतकऱ्यांना पिकांना कमी वेळात औषधे फवारण्यासाठी अडचणी येतात. या परिस्थितीला तोंड देण्यासाठी आणि शेती उत्पादन वाढवण्यासाठी ही योजना सुरू करण्यात आली आहे.

या योजनेचा उद्देश काय आहे?

या योजनेचा मुख्य उद्देश म्हणजे शेतकऱ्यांना आधुनिक शेती पद्धतींचा अवलंब करण्यासाठी प्रोत्साहित करणे आणि शेती उत्पादन वाढवणे. 100% अनुदानाच्या माध्यमातून शेतकरी स्वतःच्या खर्चावरून बॅटरी संचलित फवारणी पंप खरेदी करू शकतील.

या योजनेचा लाभ कोणत्या शेतकऱ्यांना मिळेल?

राज्यातील सर्व पात्र शेतकरी या योजनेचा लाभ घेऊ शकतात. यामध्ये छोटे आणि मध्यम शेतकरी, महिला शेतकरी आणि आदिवासी शेतकरी यांचा समावेश होतो.

शेतकरी फवारणी पंप योजना महाराष्ट्र 2024 योजनेचे फायदे:

आधुनिक बॅटरी संचलित शेती फवारणी पंपाच्या वापरामुळे शेतकरी पिकांना वेळेत रासायनिक औषधांची फवारणी करते त्यामुळे त्यांचा वेळही वाचेल.

  • खर्च कमी: शेतकऱ्यांना शेती फवारणी पंप खरेदी करण्यासाठी स्वतःचा खर्च करावा लागणार नाही, त्यामुळे त्यांचा खर्च कमी होईल.
  • वेळेची बचत: आधुनिक बॅटरी संचलित फवारणी पंपाच्या सहाय्याने शेतकरी त्यांच्या पिकांना जलदगतीने फवारणी करू शकतील आणि त्यांच्याकडे इतर कामांसाठी अधिक वेळ उपलब्ध होईल.
  • पाण्याचा प्रभावी वापर: या योजनेमुळे पाण्याचा प्रभावी वापर होईल आणि पाणी वाचवण्यात मदत होईल.
  • शेतकऱ्यांची आर्थिक स्थिती सुधारेल: पीक उत्पादन वाढल्याने शेतकऱ्यांची आर्थिक स्थिती सुधारेल आणि त्यांचे जीवनमान उंचावेल.

बॅटरी फवारणी पंपासाठी अर्ज करण्यासाठी शेवटची तारीख

शेतकरी मित्रांनो, बॅटरी संचलित शेतकरी फवारणी पंप यासाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख अजून जाहीर केलेले नाही परंतु, ही योजना जास्त दिवसासाठी राहणार नाही त्यामुळे तुम्हाला लवकरात लवकर अर्ज करावा लागणार आहे. शेतकरी फवारणी पंप योजना महाराष्ट्र 2024 अर्ज करण्याची प्रक्रिया खाली दिलेली आहे.

Favarni pump yojana online apply

शेतकरी बॅटरी फवारणी पंपासाठी ऑनलाईन अर्ज करण्याची प्रोसेस – farmer Battery Favarni Pump MahaDBT Yojana 2024

शेतकरी मित्रांनो, आता तुम्हाला शेतीसाठी 100% अनुदानावर बॅटरीवर चालणारे फवारणी पंप मिळणार आहे. हा पंप बॅटरीवर चालणारा असून याचा उपयोग शेतीसाठी केला जाणार आहे. या योजनेसाठी महाराष्ट्र कृषी विभागाच्या माध्यमातून महाडीबीटी पोर्टल द्वारे तुम्ही अर्ज करू शकता. या पोर्टलवर तुम्ही केलेले अर्ज स्वीकारण्यात येणार आहे.

अर्ज प्रक्रिया:

  • शेती फवारणी पंप योजना अर्ज कसा करावा? शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ घेण्यासाठी संबंधित कृषी विभागाच्या कार्यालयात अर्ज करावा लागेल. अर्ज ऑनलाइन किंवा ऑफलाइन पद्धतीने केला जाऊ शकतो.
  • शेती फवारणी पंप योजनेसाठी आवश्यक पात्रता
  •  शेतकऱ्याचे स्वतःचे आधार कार्ड असणे गरजेचे आहे
  •  शेतकऱ्याकडे जमिनीच्या ७/१२ उतारा व ८ अ  पाहिजे
  •  शेतकरी अनु. जाती , अनु.जमाती मधील असल्यास जातीचा दाखला आवश्यक आहे.
  •  फक्त एकाच यंत्रासाठी अनुदान देय राहील.
  •  कुटुंबातील कोणत्याही एका व्यक्तीच्या नावावर ट्रॅक्टर असल्यास , ट्रॅक्टरला आवश्यक असणारे अवजारासाठी लाभ मिळण्यास पात्र असेल परंतु ट्रॅक्टर असल्याचा पुरावा सोबत जोडणे गरजेचे आहे.
  • जर तुम्ही पहिले महाडीबीटी मार्फत या योजनेचा यंत्रांसाठी लाभ घेतला असल्यास त्याच घटक/ यंत्रासाठी पुढील १० वर्षे अर्ज करता येणार नाही परंतु इतर यंत्रांसाठी अर्ज करता येईल
  • कुठे अर्ज करावा? शेतकरी आपल्या तालुक्यातील कृषी विभागाच्या कार्यालयात अर्ज करू शकतात. किंवा ऑनलाईन महाडीबीटीच्या पोर्टल द्वारे अर्ज करू शकता.
  • ऑनलाइन अर्ज करण्याची प्रक्रिया: ऑनलाइन अर्ज करण्यासाठी शेतकऱ्यांना संबंधित वेबसाइटवर जाऊन आवश्यक माहिती भरून अर्ज सबमिट करावा लागेल

जर तुला तुम्हाला अर्ज करण्यास काही समस्या येत असेल तर तुम्ही या ठिकाणी क्लिक करून तुम्ही पाहू शकता

(Favarni Pump Yojana maharashtra 2024) शेती फवारणी पंप योजनेसाठी लागणारी आवश्यक कागदपत्रे

  • आधार कार्ड
  •  ७/१२ उतारा

  •  ८ अ चा दाखला
  •  खरेदी करावयाच्या अवजाराचे कोटेशन व केंद्र शासनाच्या मान्यताप्राप्त तपासणी संस्थेने दिलेला तपासणी अहवाल. अहवाल तुम्ही कृषी अधिकाऱ्याकडून सुद्धा घेऊ शकता.
  •  जातीचा दाखला ( अनु. जाती व अनु. जमाती साठी )
  •  स्वयं घोषणापत्र
  •  पूर्व संमती पत्र

Favarni Pump Yojana maharashtra 2024 शेती फवारणी पंप साठी ऑनलाइन अर्ज करण्याची संपूर्ण प्रोसेस

Battery Favarni Pump MahaDBT

       हे पहा

 kisan credit card 2024: अर्ज कसा करावा, काय आहे, पात्रता व लाभ

Favarni Pump Yojana maharashtra 2024

अर्ज प्रक्रिया:

ऑनलाईन अर्ज करण्यासाठी तुम्ही या वेबसाईटवरून अर्ज करू शकता –https://mahadbt.maharashtra.gov.in/

  1. महडबीटी पोर्टलवर लॉगिन करा:

    • महडबीटी पोर्टलच्या अधिकृत वेबसाइटवर जाऊन आपल्या शेतकरी नोंदणी क्रमांक आणि पासवर्ड वापरून लॉगिन करा.
    • जर तुमची नोंदणी झालेली नसेल तर प्रथम नोंदणी करा.
  2. योजना निवडा:

    • होम पेजवर उपलब्ध असलेल्या योजनांच्या यादीतून ‘शेती फवारणी पंप योजना’ निवडा.
  3. अर्ज फॉर्म भरून सादर करा:

    • ऑनलाइन अर्ज फॉर्ममध्ये मागितलेली सर्व माहिती काळजीपूर्वक भरा.
    • आवश्यक कागदपत्रांची स्कॅन केलेली प्रत अपलोड करा.
    • अर्ज फॉर्म पुनरावलोकन करून सर्व माहिती बरोबर आहे का तपासा.
    • शेवटी ‘सादर करा’ बटणावर क्लिक करा.
  4. अर्ज प्रक्रियेची पावती डाउनलोड करा:

    • यशस्वी अर्ज सादर झाल्यानंतर आपल्याला एक पावती मिळेल. ही पावती सुरक्षित ठेवा.

Favarni Pump Yojana maharashtra 2024 अर्ज स्थिती तपासणी:

  • आपण ऑनलाइन पोर्टलवर लॉगिन करून आपल्या अर्जाची स्थिती तपासू शकता.
  • अर्ज स्वीकृत झाल्यास पुढील प्रक्रियेबाबतची माहिती आपल्याला मिळेल.

महत्वाच्या गोष्टी:

  • अर्ज करताना सर्व माहिती अचूक भरल्याची खात्री करा.
  • आवश्यक कागदपत्रांच्या स्पष्ट आणि वाचनीय स्कॅन केलेल्या प्रती अपलोड करा.
  • अर्ज सादर करण्याची अंतिम तारीख न सोडता वेळेत अर्ज करा.
  • अर्ज प्रक्रियेत कोणतीही समस्या आल्यास संबंधित कृषी विभागाच्या कार्यालयाशी संपर्क साधा.

नोट:

  • महडबीटी पोर्टल आणि Favarni Pump Yojana maharashtra 2024 योजनेच्या नियमांमध्ये बदल होऊ शकतात. त्यामुळे अर्ज करण्यापूर्वी संबंधित अधिकृत वेबसाइटवर नवीनतम माहिती तपासणे आवश्यक आहे.
  • योजनेच्या तपशीलवार माहितीसाठी आपल्या जिल्ह्याच्या कृषी विभागाच्या कार्यालयाशी संपर्क साधा.

या माहितीच्या आधारे आपण सहजपणे शेती फवारणी पंप योजनेसाठी ऑनलाइन अर्ज करू शकता.

बॅटरी फवारणी पंपाच्या अर्जाचे स्टेटस असे पाहू शकता. (Battery Favarni Pump MahaDBT Application Status):

तुम्हाला जर तुमच्या अर्जाची सद्यस्थिती बघायची असेल म्हणजेच अर्जाचे स्टेट्स बघायचे असेल तर मी अर्ज केलेल्या बाबी या पर्यायावर क्लिक करा.

छाननी अंतर्गत अर्ज या पर्यायावर क्लिक करा. या ठिकाणी तुम्हाला तुमच्या अर्जाचे तपशील पहावयास मिळेल.

कृपया लक्षात घ्या की ही माहिती सामान्य स्वरूपाची आहे. कोणत्याही शंका किंवा समस्यांसाठी संबंधित अधिकाऱ्यांचा सल्ला घ्यावा.

हेल्पलाईन क्रमांक: 022-49150800

Leave a Comment