bandhakam kamagar yojana maharashtra (मोफत भांडी योजना 2024)
नमस्कार मित्रांनो तुम्हाला माहित आहे का, आता तुम्हाला ₹2000 ते ₹5000 रुपयापर्यंतची आर्थिक मदत आणि घरातील उपयोगासाठी येणाऱ्या भांड्यांचा संच सरकारद्वारे तुम्हाला मिळू शकतो? जर तुम्ही महाराष्ट्रातील रहिवासी असाल तर, महाराष्ट्र सरकार ने सुरु केलेल्या कामगारांच्या कल्याणासाठी बांधकाम कामगार योजना (मोफत भांडी योजना) ची सुरुवात केली आहे. या योजनेअंतर्गत कामगारांना ₹2000 ते ₹5000 पर्यंतचे आर्थिक मदत दैनंदिन जीवनातील आर्थिक क्षमता भागवण्यासाठी आणि घरातील उपयोगांमध्ये येणाऱ्या भांड्यांचा संच दिला जात आहे. तर मित्रांनो या योजनेच्या माध्यमातून तुम्हाला कोण कोणते लाभ मिळणार आहे आणि या योजनेची विशेषता काय आहे, या योजनेसाठी कोण पात्र असणार आहे, अर्ज करण्यासाठी कोण कोणते डॉक्युमेंट लागणार आहे, ही सर्व माहिती या लेखांमध्ये तुम्हाला पाहायला मिळेल म्हणून या लेखाला शेवटपर्यंत जरूर वाचा.
बांधकाम कामगार योजनेचा मुख्य उद्देश काय आहे (मोफत भांडी योजना 2024)
महाराष्ट्र सरकारद्वारे बांधकाम कामगार योजना सुरू करण्यामागील उद्देश म्हणजे राज्याच्या विकासासाठी बांधकाम कामगार यांचे योगदान खूप मोठे आहे. कामगार हे राज्यातील रस्ते इमारती पूल आणि विविध राबविण्यात येणाऱ्या योजनांमध्ये त्यांचे मोठे योगदान असते. बांधकाम कामगार योजनेची सुरुवात होण्याअगोदर पहिले सर्व कामगार कोणतीही सुरक्षा किट न वापरता काम करत होते. त्यामध्ये त्यांना विविध प्रकारच्या दुर्घटनांचा सामना करावा लागत होता. जसे की जखमी होणं, विकलांगता आणि कधी कधी तर मृत्यू सुद्धा होत असे. या सर्व घटनांवर लक्ष देऊन महाराष्ट्र सरकारने 1 मे 2011 रोजी बांधकाम कामगार कल्याण मंडळाची स्थापना केली आणि या विभागाद्वारे बांधकाम कामगार योजना ची सुरुवात वर्ष 2020 मध्ये सुरू झाली.
ही योजना सुरू होण्याअगोदर सर्व कामगारांना सेफटीकीट दिली गेली, त्यामध्ये दुर्घटनांमध्ये कमतरता आढळली गेली. याच्या व्यतिरिक्त कोरोना काळामध्ये सर्व कामगारांना अनेक संकटांचा सामना करावा लागला. याचा आढावा घेऊन बांधकाम कामगार योजनेअंतर्गत महाराष्ट्राच्या सर्व कामगारांना आणि त्यांच्या परिवारांना ₹2000 ते ₹5000 रुपयांची आर्थिक मदत आणि घरातील वापरासाठी विविध वस्तू देण्यात आल्या, आणि या योजनेअंतर्गत विविध सरकारी योजनांचे लाभ सुद्धा दिले गेले.
बांधकाम कामगार योजनेचा लाभ कोणत्या कामगारांना मिळतो?
बांधकाम कामगार योजनेसाठी हे कामगार पात्र असतील.
- इमारत बांधकाम कामगार
- रस्ते निर्माण करणारे कामगार
- रेल्वे कामगार
- विमानतळावरील कामगार
- शेतातील कामगार
- पाणी बाहेर काढणारे कामगार
- तटबंदी आणि जलवाहतुकीची कामे करणारे कामगार
- पूरग्रस्त ठिकाणी कर कार्य करणारे कामगार
- वीज पुरवठा कामगार
- पाण्याची संबंधित कामे करणारे कामगार
- तेल आणि वायू या संबंधित कामे करणारे कामगार
- रेडिओ टेलिव्हिजन आणि टेलिफोन संबंधित कामे करणारे कामगार
बांध, ओढे, जलाशय, जलकुंडे, गुफा, पूल, पाईपलाईन, टॉवर विविध कामे करणारे कामगार.
विशिष्ट कामे करणारे कामगार
- दगड कापणी व तोडणारे कामगार
- घरातील फरशा कापणारे व पॉलिश करणारे कामगार
- पेंट वार्निश आणि इत्यादी कामे करणारे कामगार
- गटर आणि प्लंबिंग कामगार
- वायरिंग वितरण आणि विद्युत कामगार
- अग्निशामक यंत्रांची निर्मिती आणि त्यांना दुरुस्त करणारे कामगार
- एअर कंडिशनिंग यंत्र तयार करणारे आणि त्यांचे दुरुस्ती करणारे कामगार
- लिफ्ट कामगार
- सुरक्षा यंत्रणांना तयार करणारे कामगार
- लोखंड आणि विविध धातूंच्या खिडक्या आणि दरवाजे बनवणारे कामगार
- शेतामध्ये काम मोलमजुरी करणारे कामगार
- प्लास्टर करणारे कामगार
मोफत भांडी संच योजनेअंतर्गत दिली जाणारी भांडी
भांडी | नग |
ताट | 4 |
वाटया | 8 |
पाण्याचे ग्लास | 4 |
पातेले झाकणासह | 1 |
पातेले झाकणासह | 1 |
पातेले झाकणासह | 1 |
मोठा चमचा | 1 |
मोठा चमचा | 1 |
पाण्याचा जग (2 लीटर) | 1 |
मसाला डब्बा (7 भाग) | 1 |
डब्बा झाकणासह (14 इंच) | 1 |
डब्बा झाकणासह (16 इंच) | 1 |
डब्बा झाकणासह (18 इंच) | 1 |
परात | 1 |
प्रेशर कुकर 5 लिटर (स्टेनलेस स्टील) | 1 |
कढई (स्टील) | 1 |
स्टीलची टाकी (मोठी) झाकणासह व वगराळासह | 1 |
एकूण | 30 |
बांधकाम कामगार योजनेसाठी काय पात्रता आवश्यक पाहिजे?
या योजनेसाठी अर्ज करण्यासाठी त्या योजनेसाठी पात्र असतले पाहिजे
- अर्जदार व्यक्ती महाराष्ट्राचा रहिवासी असणे आवश्यक आहे
- अर्जदाराचे वय 18 पासून ते साठ वर्षापर्यंत असणे आवश्यक आहे
- योजनेचा लाभ घेण्यासाठी कामगाराला 90 काम केल्याचे प्रमाणपत्र घेणे आवश्यक आहे.
- अर्जदाराने कामगार कल्याण मंडळाकडे नोंदणी केलेली असावी.
बांधकाम कामगार योजनेसाठी अर्ज करण्यासाठी कोणकोणत्या कागदपत्रांची आवश्यकता आहे?
या योजनेअंतर्गत अर्ज करण्यासाठी तुम्हाला काही कागदपत्रांची आवश्यकता पडेल.
- आधार कार्ड
- राशन कार्ड
- रहिवासी प्रमाणपत्र
- जन्म प्रमाणपत्र
- उत्पन्न दाखला
- मोबाईल नंबर
- ओळखीचा पुरावा
- पासपोर्ट साईट फोटो
- 90 दिवस काम केल्याचे प्रमाणपत्र
- बँकेचे पासबुक
बांधकाम कामगार योजनेचे फायदे आणि वैशिष्ट्ये
- बांधकाम कामगार योजनेच्या माध्यमातून कामगारांना दोन हजार रुपये तपासून ते पाच हजार रुपये पर्यंतचे आर्थिक मदत केली जाते
- कामगाराच्या परिवाराला घरातील वापरासाठी भांडी संच प्रदान केला जातो.
- कामगाराच्या लग्नासाठी ₹30000 रुपये आर्थिक सहाय्य म्हणून मदत केली जाते.
- या योजनेअंतर्गत कामगाराच्या परिवारातील मुलीच्या लग्नासाठी 51 हजार रुपये मदत म्हणून दिले जातात.
- कामगाराच्या परिवारातील जर कोणती मुलगी शिक्षण घेत असेल तर त्या मुलीस स्कॉलरशिप सुद्धा दिली जाते, त्यामुळे ती मुलगी तिच्या शिक्षण कोणत्याही अडचणीत पूर्ण करेल.
- या योजनेअंतर्गत नोंदणीकृत कामगाराला प्रधानमंत्री आवास योजनेचा लाभ दिला जातो.
- अर्जदार कामगारास या योजनेच्या अंतर्गत मिळणारी संपूर्ण आर्थिक मदत डीबीटीच्या माध्यमातून त्याच्या बँक अकाउंट मध्ये जमा केली जाते.
- या योजनेअंतर्गत तुम्ही कोणतीही समस्या न येता त्यासाठी तुम्ही अर्ज करू शकता.
बांधकाम कामगार योजनेसाठी ऑनलाईन अर्ज करण्याची प्रक्रिया काय आहे?
- या योजनेअंतर्गत अर्ज करण्यासाठी तुम्हाला सरकारच्या अधिकृत वेबसाईटवर(mahabocw.in)जावे लागेल
- त्या ठिकाणी तुम्हाला वेबसाईटच्या होम पेज वर worker registration या ऑप्शनवर क्लिक करावे लागेल.
- त्यानंतर तुमच्यासमोर एक नवीन टॅब ओपन होईल, त्यामध्ये तुम्ही तुमचे आधार कार्ड आणि तुमचा पत्ता तुमच्या आधार कार्ड ला लिंक असलेला मोबाईल नंबर टाकून proceed बटन वर क्लिक करायचे आहे.
- हे केल्यानंतर तुमच्यासमोर योजनाचा रजिस्ट्रेशन फॉर्म ओपन होईल.
- यानंतर फॉर्ममध्ये दिलेले संपूर्ण माहिती अचूक भरायचे आहे.
- आता तुम्हाला आवश्यक असणाऱ्या संपूर्ण डॉक्युमेंट चे फोटो त्या ठिकाणी अपलोड करायचे आहे.
- त्यानंतर तुम्हाला सबमिट बटन वर क्लिक करून फॉर्म सबमिट करायचा आहे.
बांधकाम कामगार योजनेसाठी अर्ज करताना जर काही अडचणी किंवा समस्येत असेल तर त्यासाठी ई-मेल आणि हेल्पलाइन नंबर आहे.
Email-bocwwboardmaha@gmail.com
Toll free number- 1800 8892 816 / 002 2657 2361
निष्कर्ष
आशा करतो आम्ही सांगितलेली काम कामगार योजनेविषयी संपूर्ण माहिती दिलेली आहे. ही योजना महाराष्ट्रातील कामगार लोकांना आर्थिक विकास संबंधित खूप महत्वपूर्ण आहे. त्यामध्ये आमदारांसोबत त्यांचा परिवारांना आर्थिक सहाय्य दिले जाते. तर तुम्हाला आमचा हा लेख आवडला असेल, तर तुम्ही याला तुमच्या मित्रांना आणि परिवारतील लोकांना जरूर शेअर करा, त्यामुळे ते सुद्धा या योजनेचा लाभ घेऊ शकतात. धन्यवाद!